पुणे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आप आपले उमेदवार जाहीर करत आहेत. शहरातील शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसने वेळ घेतला आहे. रविवारी सायंकाळी शिवाजीनगर मधून दत्तात्र्य बहिरट तर पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Dattatrya Bahirat from Shivajinagar, Ramesh Bagwe from Pune Cantonment) त्यामुळे पुणे शहरातील आठ ही विधानसभा मतदार संघांतील प्रमुख उमेदवार जाहीर झाले आहेत. (Congress announced the fourth list of 14 candidates)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed