काँग्रेसने 14 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर ; शिवाजीनगरमधून दत्तात्र्य बहिरट तर पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे यांना उमेदवारी

पुणे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आप आपले उमेदवार जाहीर करत आहेत. काँग्रेसने आपल्या 14 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. त्यात पुणे शहरातील शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसने वेळ घेतला आहे. रविवारी सायंकाळी शिवाजीनगर मधून दत्तात्र्य बहिरट तर पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Dattatrya Bahirat from Shivajinagar, Ramesh Bagwe from Pune Cantonment)  त्यामुळे पुणे शहरातील आठ ही विधानसभा मतदार संघांतील प्रमुख उमेदवार जाहीर झाले आहेत. (Congress announced the fourth list of 14 candidates)

महाविकास आघाडीमधील काँग्रेसने आपल्या विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. तर, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली.  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ भालकेंना (Pandharpur-Mangalvedha Constituency Bhagirath Bhalke) मैदानात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे भगिरथ भालके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, आता काँग्रेसकडून (Congress) अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने 4 थ्या यादीत अंधेरी पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या जागांवरील उमेदवारांची नावे बदलली आहेत.

 

सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाले आहे. महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमर पाटील हे उद्या आपला अर्ज दाखल  करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे.  सोलापुर दक्षिणमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढत होणार की ठाकरे गट उमेदवारी माघार घेणार हे पाहणे महत्वाचे महत्वाचे ठरणार आहे.

 

काँग्रेसची तिसरी यादी जाहिर बेटमोगरेकर, निवृत्तीराव कांबळे, हंबर्डे  काँग्रेसचे उमेदवार

 काँग्रेसने तिसऱ्या यादीत अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांनी उमेदवारी दिली होती, मात्र ती रद्द करुन अशोक जाधव यांना देण्यात आली आहे. तर, औरंगाबाद पश्चिममधून मधूकर देशमुख यांच्याऐवजी लहू शेवाळे यांना देण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून काँग्रेसच्या दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, पुणे कॅनटॉनमेंट विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

काँग्रेसची 4 थी यादी

1.अमळनेर – अनिल शिंदे
2.अमरेड – संजय मेश्राम
3.आरमोरी – रामदास मश्राम
4.चंद्रपूर – प्रवीण पडवेकर
5.बल्लारपूर – संतोष सिंह रावत
6.वरोरा- प्रवीण काकडे
7.नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार
8.ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे
9.नालासोपारा- संदीप पांडेय
10.अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
11.शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट
12.पुणे छावणी- रमेश बागवे
13.सोलापूर दक्षिण- दिलीप माने
14.पंढरपूर- भगिरथ भालके
Local ad 1