Fire audit : पुण्यातील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांचे फायर ऑडिट करा : कलपेश यादव 

पुणे : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी राज्यभरातून पुण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी जगो जागी अभ्यासिका सूरू कऱण्यात आले असून, त्याठिकाणी आग लागल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. अभ्यासिका सुरू करताना अग्निशमन दलाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. शहरातील सर्व अभ्यासिकांचे फायर ऑडिट करावे, अशी मागणी युवा सेनेचे सह सचिव कल्पेश यादव (Yuvasena Joint Secretary Kalpesh Yadav) यांनी पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले आहे. (Conduct a fire audit of competitive exam study centers : Kalpesh Yadav)

 

 

हडपसर विधानसभा मतदार संघातून रशिद शेख यांना उमेदवारी द्या ; मुस्लिम समाजाची मागणी

 

पुण्यातील गांजवे चौक परिसरातील अभ्यासिकेला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत अभ्यासिकेतील लॅपटॉप, पुस्तके ,खुर्च्या आदी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिल्ली येथे अभ्यासिकेत पाणी घुसल्याने अनेक होतकरू तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर अभ्यासिकेनेच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे.विद्यार्थी राज्यातील विविध ठिकाणाहून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. त्यांना सुरक्षित वातावरणात अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

 

 

 

पुणे शहरात अनेक इमारतींमध्ये तसेच जुन्या वाड्यांमध्ये लहान मोठ्या अभ्यासिका सुरू आहेत. या अभ्यासिकांच्या माध्यमातून लाखो रुपये कमाविण्याचा धंदा अनेकांनी उघडला आहे. विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेच्या तुलनेत त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या फारच तुटपुंज्या स्वरूपाच्या आहेत. *प्रत्येक अभ्यासिकेचे फायर ऑडिट होणे गरजेचे आहे. (Conduct a fire audit of competitive exam study centers)

 

 

ध्रुवतारा या अभ्यासिकेचे फायर ऑडिट न झाल्यामुळेच येथे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने येथे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, जीवित हानी झाल्यास त्यास कोणाला जबाबदार धरावे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे यापुढील काळात खाजगी क्लासचा धंदा उघडून नफेखोरी करणाऱ्या संस्थांना तसेच महाविद्यालयांना युवासेना जागा दाखविल्याशिवाय शांत राहणार नाही.

 

पालिका प्रशासनाने पुढील आठवड्यात पुणे शहरातील सर्व अभ्यासिकांचे फायर ऑडिट न केल्यास पालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अभ्यासिका चालकांच्या विरोधात आंदोलने उभी केलीजाईल असा इशारा यादव यांनी दिला.

 

 

 

 

 

Local ad 1