वर्षा पर्यटनासाठी एमटीडीसीकडून सोयी, सवलती
भाग -२
आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, शुभ्र खळखळत फेसाळणारे झरे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल, आल्हाददायक गुलाबी थंडी आणि वर्षा-पर्यटन (Pink chill and rain-tourism) हे अनुभवायचं असेल तर पर्यटनाला जावंच लागेल… (Facilities, concessions from MTDC for year round tourism)
पावसानं थोडी उसंत घेतली कि हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता यासाठी पर्यटन करायचंय, मग या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (Maharashtra Tourism Development Corporation) निसर्गरम्य ठिकाणं आपणास साद घालीत आहेत. फक्त शासनानं दिलेल्या सुचनांच पालन करायचं आणि धोकादायक ठिकाणी न जाता पर्यटनाचा आनंद लुटायचा… (Facilities, concessions from MTDC for year round tourism)
वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासून दुर निसर्गरम्य ठिकाणी मनमुराद पावसाचा आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यास पर्यटक आसुसलेले आहेत. (Facilities, concessions from MTDC for year round tourism)
जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे
नयनरम्य अशा मनोहारी लोणार सरोवराच्या सानिध्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास लोणार असुन या ठिकाणी 8 अद्ययावत असे वातानुकुलित सुट पर्यटकांना सेवा देत आहेत. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या या परिसरामध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासात चवदार भोजनाची सोय करण्यात येत आहे. अजंठा लेण्यांच्या पसिरात आणि जवळच फर्दापुर येथे महामंडळाकडुन आरामदायी अशा कॉटेज बांधलेलल्या आहेत. लेण्यापासून जवळच असल्याने सदरची पर्यटक निवासांचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आरक्षण करताना दिसत आहेत.