...

Complete information about Pune Ring Road  पुणे रिंगरोडची संपूर्ण माहिती जाणून घ्या… किती शेतकरी बाधित होणार अन् त्यांना मोबदला किती मिळणार ?

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंग रोड प्रकल्पासाठी पश्चिम मार्गावरील 32 गावांचे, तर पूर्वेकडील 4 गावांचे नवीन फेरमूल्यांकनानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार 802 हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून, दोन हजार 581 स्थानिक बाधित होत आहे. (Complete information about Pune Ring Road)

 

सर्व बाधितांना येत्या 31 जुलै महिन्यापर्यंत नोटीस बजावून उप विभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करून संमतिपत्र घेण्याचे आदेश दिल्याने दीर्घ कालावधीनंतर वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आहे.

 

एमएसआरडीसीच्या प्रस्तावित रिंगरोडसंदर्भात मूल्यांकन प्रक्रिया पार पडल्यानंतर उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंंडल अधिकारी, तलाठी आणि एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संयुक्त कार्यशाळा पार पडली.

 

या कार्यशाळेत  भूसंपादन करताना भूधारकांना विश्वासात घेऊन  नोटीस बजावणे, त्यांची संमती घेणे, जे भूधारक मयत आहेत किंवा बाहेरगावी आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून वारसांकडून संमतिपत्र, हमीपत्र तयार करून घेणे, करारनामे, निवाडे आदी विषयासंदर्भात कार्यशाळा घेऊन अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या.

 

पश्चिम भागातील बाधित होणार्‍या मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्यातील 32 गावांतील 697 हेक्टर क्षेत्रातील दोन हजार 404 स्थानिक बाधित होणार आहे, तर पूर्वेकडील भोर तालुक्यातील 4 गावांतील 105 हेक्टर क्षेत्रातील 177 स्थानिक बाधित होत आहे. या स्थानिकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहे.

 

फेरमूल्यांकनाच्या आदेशामुळे विलंब

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून 172 किलोमीटर आणि 110 मीटर रुंदीचा रिंगरोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व मार्गातील मावळ तालुक्यातून 11, खेड 12, हवेली 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून प्रस्तावित आहे, तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील पाच, हवेली 11, मुळशी 15 आणि मावळ तालुक्यातून सहा गावे बाधित होणार आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी 26 हजार 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

रिंगरोड रस्त्याच्या पश्चिमेकडील बाधित 32 गावांचे फेरमूल्यांकन करून दर निश्चिती करण्यात आली आहे, तर पूर्वेकडील 48 गावांपैकी 4 गावांची दरनिश्चिती झाली असून 42 गावांचे अंतिम दर निश्चित करण्यासाठी 20 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. संमती पत्र होताच संमती करारनामा होताच जमीन मालकाला 25 टक्के वाढीव मोबदला देण्यात येईल.
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

 

Local ad 1