...

Honey trap | सोशल मीडियावरील मैत्रीणीने बांधकाम व्यवसायिकाला “इतक्या” रुपयांना घातला गंडा

Pune crime पुणे (MH TIMES NEWS) : सोशल मीडियावर मैत्री करुन पैसे उकळण्याचे प्रकार वाढले असून, (Honey trap) असाच प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. त्याचे झाले असे की, पनवेल येथील एका बांधकाम व्यवसायिकाची इन्स्टाग्रामवर पुण्यातील तरुणीसोबत ओळख झाली. (A young woman from Pune met a builder from Panvel) या तरुणीने व्यवसायिकाला भेटण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलावले. त्यानंतर आपल्या इतर साथीदारासह 70 हजार रुपये हिस्कावून घेतले. त्यानंतरही पैसे न दिल्यास बलात्काराची पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देत होती. (Threatened to lodge a false complaint of rape with the police if not paid)

 

खबरदार : “डेल्टा पल्स व्हेरिएंट”ला हलक्यात घेऊ नका ; लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्या महिलेचा मृत्यू

आकुर्ली न्यु पनवेल येथील एका 31 वर्षीय व्यवसायिकाने (Honey trap) कोंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन इस्टाग्राम आयडीवरील महिला व तिच्या तिघा साथीदारांच्या विरुद्ध खंडणी, जबरी चोरी, मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.8) दुपारी साडेतीनच्या सुमारास येवलेवाडी कोंढवा परिसरात घडला आहे. (Threatened to lodge a false complaint of rape with the police if not paid)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची इन्स्टाग्रामवर पुण्यातील एका तरुणीसोबत ओळख झाली होती. (Honey trap) ओळखीतून त्यांचा परिचय वाढत गेला. रविवारी तिने व्यवसायिकाला भेटण्यासाठी कोंढवा येथील येवलेवाडी परिसरात बोलावले होते. त्यानुसार व्यवसायिक आला होता. त्यावेळी आरोपी तरुणीने त्यांच्या अंगाशी झटून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर व्यवसायिक हा त्यांच्याकडील चारचाकी गाडीत बसून तरुणीसोबत निघाले होते. (Threatened to lodge a false complaint of rape with the police if not paid)

 

डेल्टा पल्सने राज्याची चिंता वाढवली ; आरोग्य विभाग म्हणतोय…

 

अचानक तिघा अनोळखी व्यक्तींनी गाडी अडवून गाडीत बसून त्यांना मारहाण केली. तसेच इन्स्टाग्रामवरील महिलेसोबत बलात्कार केला असल्याची पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर संबंधीत आरोपी महिलेसोबत त्यांना लग्न करावे लागेल असे कागदावर लेखी घेतले. त्यानंतर व्यवसायिकाकडे पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली. (Honey trap) यावेळी व्यवसायिकाच्या खिशातील 50 हजाराची रोकड व त्यांच्या जवळील एटीएम कार्डद्वारे 30 हजार असे 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रारीत नमुद करण्यात आले आहेत.घेतले. आरोपी महिला व तिच्या इतर साथीदारांनी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. शेवटी त्यांनी तीन दिवसापुर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. (Threatened to lodge a false complaint of rape with the police if not paid)

 

 

Local ad 1