drug case in Sassoon Hospital | ड्रग्ज प्रकरण ससून रुग्णालय प्रशासनाला भोवणार ; चौकशी समिती गठित

drug case in Sassoon Hospital : ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण व त्यासंबंधित घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ (Minister of Medical Education and Medicines Hasan Mushrif) यांनी दिली आहे. (Committee constituted to investigate drug case in Sassoon Hospital)

 

 

  मुश्रीफ म्हणाले, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे अध्यक्ष असून सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, मुंबई ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार हे सदस्य म्हणून काम पाहतील. (Committee constituted to investigate drug case in Sassoon Hospital)

          या समितीने सखोल चौकशी करून आपला सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Local ad 1