खबरदार : खरीप हंगाम बियाणे, खताची कृतीम टंचाई केल्यास कारवाई
नांदेड जिल्ह्यातील 7 लाख 74 हजार 519 हेक्टरवर खरीप हंगामाची होणार पेरणी
नांदेड : घरचे बियाणे असेल तर बीज प्रक्रियाही आवश्यक आहे. बाजारात इतर बियाणांबाबत कृत्रीम टंचाई कोणी निर्माण करत असेल तर संबंधितांविरुद्ध कारवाईसाठी तालुकापातळीवरील कृषि अधिकाऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. याचबरोबर बियाणे व खतांच्या ठरवून दिलेल्या मूल्यापेक्षा अधिक दराने जर कोणी विक्री करत असेल तर त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. (Collector warns of action in case of shortage of Kharif season seeds, fertilizers)
कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. यात विशेषत: मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत शेततळे योजना महत्त्वाची आहे. वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्याच्यादृष्टिने त्यांचे विहित नमून्यातील अर्ज महत्त्वाची आहेत. यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. (Collector warns of action in case of shortage of Kharif season seeds, fertilizers)