जिल्हाधिकारी अभिजित राऊत वाळू उत्खनन रोखण्यासाठी रात्री पोहोचले नदीपात्रात

नांदेड : जिल्ह्यातील नदी पात्रातून वाळू उपसा केला जात आहे. ते रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी कंबर कसली आहे. लोहा तालुक्यातील पेनूर येथील गोदावरी नदीपात्रात (Godavari River Basin) सोमवारी (दिनांक 14 नोव्हेंबर)  रात्री 10 वा. अचानक भेट देऊन अवैध वाळू उपसा करणारे साहित्य नष्ट केले. (Collector Abhijit Raut reached the riverbed at night to stop sand mining)

 

Collector Abhijit Raut reached the riverbed at night to stop sand mining
Collector Abhijit Raut reached the riverbed at night to stop sand mining

 

गोदावरी नदीच्या पात्राला त्यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत अडचणीच्या ठिकाणी एकूण 6 तराफे लावलेले त्यांना आढळून आले. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी हे तराफे नष्ट करण्याच्या सूचना उपविभागीय दंडाधिकारी शरद मंडलिक यांना केल्या. (Collector Abhijit Raut reached the riverbed at night to stop sand mining)

 

Collector Abhijit Raut reached the riverbed at night to stop sand mining
Collector Abhijit Raut reached the riverbed at night to stop sand mining
उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, मंडळ अधिकारी डी. एल. कटारे, तलाठी राजु इंगळे, रायाजी, मोतीराम पवार, मारोती कदम यांच्या पथकाने हे साहित्य नष्ट केले. सदर कारवाई रात्री 12 पर्यंत सुरू होती. (Collector Abhijit Raut reached the riverbed at night to stop sand mining)
पेनूर व बेटसांगवी येथे होत असलेल्या अवैध रेती विरुद्ध जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली होती. अनेक तराफे नष्ट करून आलेला अवैध रेतीसाठा जप्त केला होता. या कारवाई पाठोपाठ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आता रात्री अचानक भेट देऊन केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. (Collector Abhijit Raut reached the riverbed at night to stop sand mining)
Local ad 1