नवीन आर्थिक वर्षात सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता ?

CNG : देशात महागाई उच्च पातळीवर असून, त्यातच अजून एक बातमी समोर येत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिश्याला झटका बसण्याची शक्यता व्यक्ता केली जात आहे. 1 एप्रिल 2023 पासून देशात नैसर्गिक वायूच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (CNG rates likely to increase in the new financial year)

महिला आयपीएल : मुंबई इंडियन्सनकडून दिल्ली कॅपिटल्स पराभूत

 

केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच देशात उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमती वाढविण्याचा विचारात आहे. सरकार 1 एप्रिल रोजी या संदर्भात निर्णय जारी करण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूचे दर वाढल्याने सीएनजी-पीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑटो रिक्षा, टेम्पोचे भाडे वाढ होणार हे निश्चित आहे. (CNG rates likely to increase in the new financial year)

 

गेल्या वेळी नैसर्गिक वायूच्या किंमतीत तब्बल 40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. एप्रिलपासून पुन्हा एकदा नैसर्गिक वायूच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा स्थानिक पातळीवर उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती ठरवते. या नैसर्गिक वायूचे रूपांतर CNG आणि स्वयंपाकासाठी पाईप गॅस (PNG) मध्ये केले जाते. याशिवाय नैसर्गिक वायूचा वापर वीज आणि खत निर्मितीमध्येही होतो. (CNG rates likely to increase in the new financial year)

Local ad 1