पुणे : पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel) दर सातत्याने वाढत असल्याने कमी दरात उपलब्ध असलेल्या सीएनजी (Maharashtra Natural Gas Limited) इंधनाकडे वाहनधारकांचा कल वाढला. परंतु त्यातही सातत्याने वाढ होत असून, पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpari) परिसरात पुन्हा एकदा प्रति किलो चार रुपयांनी सीएनजीचे दर वाढले आहेत. आता त्यामुळे 87 वरून 91 रुपये झाले आहेत. (CNG rates increased by four rupees)
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (Maharashtra Natural Gas Limited) म्हणजेच एमएनजीएल मार्फत पुरवठा होणारा सीएनजी गॅसच्या दरात वाढ (Increase in CNG gas price) करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात एमएनजीएलने 6 जुलै 2022 च्या मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी (Pune, Pimpri-Chinchwad, Chakan, Talegaon and Hinjewadi) या भागात 3 रूपयांनी दरवाढ लागू केली होती. (CNG rates increased by four rupees)
Related Posts
तेव्हा सीएनजी 82 रूपये प्रति किलो मिळत होता. वाढ झाल्यावर तो 85 रूपयांनी मिळू लागला. त्यानंतर एमएनजीएल प्रशासनाने मागील महिन्यात तो 6 रूपयांनी वाढविला. त्यामुळे तो 91 रूपये झाला होता. त्यानंतर प्रशासनाने त्यातील 4 रूपये पुन्हा कमी केले. त्यामुळे सीएनजीचा दर 87 रूपये झाला होता. (CNG rates increased by four rupees)
- आता पुन्हा महिन्याभरातच एमएनजीएल प्रशासनाने यामध्ये डोमेस्टिक नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजीच्या किमतीत 4 रूपयांनी वाढ केली. त्यामुळे आता सीएनजी 91 रुपये एक किलो याप्रमाणे मिळत आहे. (CNG rates increased by four rupees)