...

सीएनजी आजच भरून घ्या.. उद्यापासून “या” भागातील सीएनजी पंप चालक जाणार संपावर,

पुणे : पुणे ग्रामीण भागातील 42 सीएनजी पंप चालकांना गुजरातमधील टोरेंट गॅस कंपनी सीएनजीचा पुरवठा करते. मात्र, शासनाने मंजूर केलेले कमिशन देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने 27 जानेवारीपासून हे पंप चालक खरेदी-विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा इशार दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सीएनजी वर चालणाऱ्या वाहनाने प्रवास करणार असला तर आजच टाकी फुल करुन घ्या, असे आवाहन पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल (Dhruv Ruparel, President of Petrol Pump Drivers Association) यांनी केले आहे. (CNG pump drivers in rural areas of Pune will go on strike)

केंद्र शासनाने सीएनजी वितरकांसाठी वाढीव कमिशन जाहीर केले आहे. पुणे शहराला सीएनजी पुरवठा करणार्‍या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने वाढीव कमिशन विक्रेत्यांना दिले. मात्र, ग्रामीण भागात पुरवठा करणार्‍या टॉरेंट कंपनी व्यवस्थापन देण्यास टाळाटाळ करत आहे. (CNG pump drivers in rural areas of Pune will go on strike)

यासंदर्भात यापूर्वीही विक्रेत्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी विक्रेते आणि कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली होती. त्यात कंपनीच्या वतीने कमीशन देण्यासाठी वेळ मागून घेण्यात आले. पुन्हा दुसर्‍यांदा वेळ वाढून देण्यात आली. मात्र, कमिशन दिले जात नाही, कधीपर्यंत देणार हे सांगितले जात नाही, त्यामुळे विक्रेत्यांनी संपावर इशारा रुपारेल यांनी व्हिडीओ जारी करत दिला आहे. (CNG pump drivers in rural areas of Pune will go on strike)

काय आहे प्रकरण…

सन 2021 मध्ये सीएनजी डीलर्सना फेअर ट्रेड मार्जिन (कमिशन) जारी करण्यात आले. मात्र, पुणे ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणार्‍या टोरेंट गॅस कंपनीला (Torrent Gas Company) अनेकवेळा विनंती करूनही त्यांनी कमिशन दिले नाही. पुणे जिल्ह्यातील सीएनजी वितरकांचे आजपर्यंत जवळपास 8 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (CNG pump drivers in rural areas of Pune will go on strike)

Local ad 1