(PM Narendra Modi) मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केल्या अकरा मागण्या

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्ठमंडळाने बैठक घेतली. त्यात मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागा, जीएसटी परतावा आणि पीकविम्याच्या अटी-शर्ती, चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टी भागातील नुकसानीचे एनडीआरएफचे निकष, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले. पंतप्रधान हे मुद्दे सकारात्मक पद्धतीने सोडवतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (CM Udhav Thackeray Meet PM Narendra Modi In Delhi)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीती निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. सुमारे दीड तास चार नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भेटीबाबत सविस्तर माहिती दिली. (CM Udhav Thackeray Meet PM Narendra Modi In Delhi)

अशा आहेत मागण्या….

  – मराठा आरक्षणाचा विषय आहे
 – तर मागासवर्ग आरक्षणाबाबतचा हा विषय देशपातळीवरचा आहे.
 – मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण
– मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय
– जीएसटीचा विषय, वेळेवर जीएसटी येणे
– शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रस्न – पीक कर्ज असतं तसं पीक विमा आहे, त्याच्या अटीशर्तीबाबत चर्चा, महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती दिली
– गेली काही वर्षे महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळं येत आहेत. मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे ९आवश्यक आहे, राज्य सरकारने गेल्यावर्षी निकष बदलून मदत केली. मुलात NDRF चे निकष बदलणे आवश्यक

– चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी
– मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा

Local ad 1