(Skill Development) रुग्णालयांत तयार होणार कुशल मनुष्यबळ
पुणे ः कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुशुल मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे भविष्यात मनुष्यबाळाच प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी शासनाच्या वतीने घेतली जात आहे. उपलब्ध सोयी-सुविधांचा वापर करुन 20 पेक्षा अधिक बेड असलेल्या रुग्णालयांमध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यातून आरोग्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार केले जाणार आहे. (CM MahaArogya Skill Development Training Program)
राज्यात कोरोनाचा संसर्ग गाव पातळीपर्यंत पोहोचला असून, उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यात रुग्णालयामध्ये काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासानाने उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन रुग्णालयामध्येच युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यासाठी 20 पेक्षा अधिक बेड असलेल्या रुग्णालये, वैद्यकीय संस्थांना व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून सूचिबद्ध होणारे प्रशिक्षण देण्यास पात्र ठरणार आहेत. हे प्रशिक्षण उमेदवारांना मोफत असून, प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षण शुल्क राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा केले जाणार आहे. (CM MahaArogya Skill Development Training Program)