सरकार घाशिराम कोतवाल चालवत आहेत का ? : हर्षवर्धन सपकाळ
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारभाराची औरंगजेबानंतर तुघलकाशी तुलना
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे, असे स्पष्ट करत आता काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Congress state president Harshvardhan Sapkal) यांनी फडणवीस सरकारच्या कामकाजाची तुलना तुघलकांशी केली आहे. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती पाहता सरकार घाशिराम कोतवाल चालवत आहेत का ? अशी टीका करत सरकारचे विकेंद्रीकरण करून महाराष्ट्राल स्वतंत्र गृहमंत्री द्यावा, अशी मागणी केली आहे. (CM Fadnavis compares Tughlaq to Aurangzeb) काँग्रेसच्या प्रदेशाध्यपद स्विकारल्यानंतर सपकाळ प्रथमच पुण्यात आले असून काँग्रेसभवन येथे पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (CM Fadnavis’ work compared to Tughlaq after Aurangzeb)
सपकाळ म्हणाले, ‘राज्यात बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, बुलढाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या, नागपूरमध्ये उसळलेली दंगल किंवा सुसंस्कृत पुण्यात स्वारगेट बस स्थानकातील महिलेवर बलात्काराची घटना आणि अंमली पदार्थांची सर्रास विक्री असताना पोलीस शांत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या राहूल सोलापूरकरला सुरक्षा प्रदान करण्यात येते, कोरटकरसारखा विकृत माणूस बिनधास्त दुबईला पळून जातो, तरी गृहविभागाला समजून येत नाही. हे अपशय समजायचे, की दुसरीकडे माजी मंत्र्याचा मुलगा न सांगता दुबईलाच जात असताना यंत्रणेचा वापर करून अवघ्या चार तासाच त्याला माघारी आणले जाते हे यश समजाचये. यावरून सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मी सरकारच्या कारभारावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची औरंगजेबाच्या कारभाराशी तुलना केली, तर माझ्या विरोधात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगतात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार वक्तव्याची चौकशी करून कारवाई करण्याबाबत सांगतात.’ मात्र, राज्यातील अशी परिस्थिती पाहता खरोखर सरकारचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहेत का असा प्रश्न निर्माण होत असून फडणवीस यांचा तुघलकी कारभार सुरू असल्याची सांगत राज्यात सरकारने महापुरूषांचा अपमान करा सुरक्षा मिळवा अशी योजना सुरू केली असल्याची खोचक टीका केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) औरंगजेबाची असलेली कबर काढून टाकाण्यावरून वाद सुरू आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात ही इंग्रज औरंगजेबासारख्या क्रुर पद्धतीने कारभार चालवत होते. त्याच इंग्रजांचे हस्तक म्हणून वावरलेले, इंग्रजी राजवटीत पेन्शन घेतलेले, (Pensioners under British rule) ज्यांनी सैन्यात भरती मध्ये मध्यस्थी केलेल्यांचे राज्यात कबरी, स्मारक, पुतळे आहेत. हे पुतळेही सध्याचे सराकर आणि सरकारसंबंधित असलेले विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तोडणार का ? असा प्रश्न सपकाळ यांनी यावेळी उपस्थित केला.