दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
घडलेला प्रकार असंवेदनशील, दोषींवर कारवाई होणार
पुणे – लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने मोठ्या कष्टाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले असून येथे अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. एका घटनेमुळे रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, घडलेला प्रकार असंवेदनशील आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाने राज्यातील अधिकाऱ्यांंसाठी बालेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (CM Devendra Fadnavis say regarding Deenanath Mangeshkar Hospital)
फडणवीस म्हणाले, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. जे चुकीचे आहे ते चुकीचंच आहे, पण आज त्यांनी पत्र काढून काही निर्णय घेतला असेल तर त्याचा मला आनंद आहे. जोपर्यंत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत या प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही. रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, असे फडणवीस म्हणाले. सांगितले.
धर्मादाय व्यवस्था एका प्लॅटफॉर्मवर आणणार – Charity system will be brought to one platform
भिसे यांच्या नातेवाईकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – Bhise’s relatives met the Chief Minister