...

बिलोली तहसीलमधील अव्वल कारकून लाच घेताना रंगेहात अडकला सापळ्यात

नांदेड Nanded Crime News : भावातील मालमतेच्या वादात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगे हात पकडले. याप्रकरणी महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. (Clerk of Biloli tehsil office arrested for taking bribe

 

बिलोली बस स्थानकासमोरील नरसी-बिलोली रोडवर, बहुजन वंचित आघाडी संपर्क कार्यालय परिसरात दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली. याप्रकरणी कारकून धोंडीबा नारायण कोकाटे, (वय ४७ वर्ष) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

तक्रारदार यांचा मालमत्तेवरून भावासोबत वाद आहे. तक्रारदार यांना तहसील कार्यालयातील कारकून धोंडीबा कोकाटे यांने सिआरपीसी कलम १४५ प्रमाणेचा प्रस्ताव तहसीलदार यांच्यासमोर ठेवण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देणे मान्य नव्हते. त्यांनी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. (Clerk of Biloli tehsil office arrested for taking bribe)

 

पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक धरमसिंग चव्हाण, राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक, अशोक इप्पर पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले, पोना किशन चिंतोरे, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव, शेख मुजीब यांनी कारवाईत सहभाग घेतला. (Clerk of Biloli tehsil office arrested for taking bribe)

Local ad 1