(Citizens’ co-operation required for Corona release: Collector) कोरोनामुक्तीसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक : जिल्हाधिकारी
औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना व्यापक प्रमाणात यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तरी सर्व धर्मगुरूंनी आपल्या स्तरावर नागरीकांना परिस्थितीचे गांभिर्य समजावून सांगत कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. (Citizens’ co-operation required for Corona release: Collector)
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने विविध धर्मांच्या धर्मगुरूंसोबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सहायक पोलीस आयुक्त ए.डी.बनकर, उपायुक्त जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Citizens’ co-operation required for Corona release: Collector)
औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना व्यापक प्रमाणात यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तरी सर्व धर्मगुरूंनी आपल्या स्तरावर नागरीकांना परिस्थितीचे गांभिर्य समजावून सांगत कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. (Citizens’ co-operation required for Corona release: Collector)
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, धर्मगुरूंनी आपल्या माध्यमातून जनतेला मास्क वापर, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखणे या नियमांचे खबरदारीपूर्वक कटाक्षाने पालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करावे. कारण जनतेने नियमांचे योग्य प्रकारे पालन केले तरच आपण हा वाढता संसर्ग वेळेत रोखून सर्वांची सुरक्षितता जपू शकतो. तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरीकांनी गर्दी न करणे, मास्क वापर सातत्याने करणे यासह प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत धर्मगुरूंनी आपल्या स्तरावरून समजून सांगावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. (Citizens’ co-operation required for Corona release: Collector)
तसेच वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी विभागीय आयुक्तांपासून पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि आपण स्वत: रस्त्यांवर, ग्रामीण भागात प्रत्यक्ष पाहणी करत आहोत. लोकांना विविध पद्धतीने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहोत. त्याला धर्मगुरूंनीही सहकार्य करत आपल्या स्तरावरून जनजागृती करून नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगण्याच्या कृतीची अंमलबजावणी करावी, असे चव्हाण म्हणाले. (Citizens’ co-operation required for Corona release: Collector)
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जिल्ह्यातील संसर्गाबाबतची सविस्तर माहिती देऊन जिल्हाधिकारी यांनी लसीकरण मोहीमेबद्दलही यावेळी माहिती दिली. सध्या ज्येष्ठ नागरीक आणि 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्यांना लस देण्यात येत असून त्याबाबतही धर्मगुरूंनी जनतेमधील शंका दूर करत त्यांना लसीकरणाची सुरक्षीतता आणि फायदे समजावून सांगत लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. (Citizens’ co-operation required for Corona release: Collector)
यावेळी पोलीस आयुक्त गुप्ता यांनी जनतेने स्वत:ला आणि आपल्या समाजाला कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क वापर, सॅनिटाझर, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे नियमित पालन करणे आता खूप गरजेचे बनले आहे. अन्यथा या वाढत्या संसर्गाने पून्हा एकदा सर्व जनजीवन ठप्प होण्याची वेळ ओढवू शकते, असे सांगून गुप्ता म्हणाले, वेळीच सर्वांनी खबरदारी घेऊन या संकटाचा एकत्रितपणे सामना केला पाहिजे. आपण गेल्या वर्षभरापासून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. मात्र गेल्या काही दिवसात ती पुन्हा बिघडत असून प्रत्येकाने त्याचे गांभिर्य लक्षात घेतले पाहिजे, असे सूचित करून गुप्ता यांनी तरूण वर्गाने रात्रीचे बाहेर पडणे, मोठ्या संख्येने एकत्र येणे, मास्क न वापरता गर्दी करणे यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. (Citizens’ co-operation required for Corona release: Collector)
यावेळी उपस्थित सर्व धर्मगुरूंनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचे सांगून या आपत्तीत प्रशासन व सर्व यंत्रणा, पोलीस बांधव अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असल्याबाबत समाधान व्यक्त करून धर्मगुरूंनी आपल्या स्तरावरून नागरिकांना आवर्जून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच लसीकरणाच्या सुरक्षेबद्दल माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले. (Citizens’ co-operation required for Corona release: Collector)