संजय बियांनी यांच्या मारेकर्‍यांच्या अटकेसाठी नागरिक संतप्त

नांदेड : बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी (Builder Sanjay Biyani) यांच्या मारेकर्‍यांना आणि सूत्रधारांना अटक करा, अशी मागणी करत कोलंबी ग्रामस्थांनी बियाणी यांची अंत्ययात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर थांबवली होती. जोपर्यंत मुख्यसूत्रधार आणि आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्ययात्रा पुढे नेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काहीकाळ अधीक्षक कार्यालयासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. (Citizens angry over demand for arrest of Sanjay Biyani’s killers)

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी दुपारी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घरासमोर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे कोलंबी येथील ग्रामस्थ आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. बुधवारी सकाळी बियाणी यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी बियाणी यांचे नातेवाईक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला. (Citizens angry over demand for arrest of Sanjay Biyani’s killers)

 

 

दरम्यान, बुधवारी दुपारी बियाणी यांची अंत्ययात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांविरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत आरोपींना आणि त्यामागील मुख्य सूत्रधारकास अटक होत नाही तोपर्यंत अंत्ययात्रा पुढे नेणार नाही, असा पवित्रा संतप्त जमावाने घेतला. त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंत्ययात्रा पुढे गेली. (Citizens angry over demand for arrest of Sanjay Biyani’s killers)

Local ad 1