अठरा वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी, कोणत्या ग्रामपंचायतीने ठराव केला पारित.. जाणुन घ्या.

पुसद : मोबाईल फोन जवळ नसेल तर अनेकांना जेवणही जात नाही. तर काहीजण अस्वस्थ होतात. कारण मोबाईलचे एक प्रकारे व्यसन लागले असून, मुला-मुलींना व्यसन जडूनये यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) पुसद मधील बान्सी ग्रामपंचायतीने (Bansi Gram Panchayat) मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. त्यासंदर्भात ठरावही केला आहे.(Children under the age of eighteen are prohibited from using mobile phones)

 

 

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी (Online education) किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल फोन (Mobile phones) आले. मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी बरेचदा वाईट परिणाम समोर आले. किशोरवयीन मुला-मुलींना मोबाईलचे व्यसन जडले. स्मार्टफोनचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊन अनेक मुलांना गेम्स आणि इथर नको त्या गोष्टी करत असल्याचे दिसून आले.

 

 यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्सी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल फोन बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बान्सी हा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. (Children under the age of eighteen are prohibited from using mobile phones)

 

 

 

पंचायत राज व्यवस्थेमुळे (Panchayat Raj) लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले असून, ग्रामविकास योजना राबवताना ग्रामसभेतील ठरावांना (Gram Sabha resolution) महत्त्व आले आहे. ग्राम विकासासोबतच समाज स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईल फोनच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली आहे.

 

 

ग्रामसभेत 18 वर्षाखालील मुलांना मोबाईल फोनची बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याशिवाय शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कौतूक होत आहे.  (Children under the age of eighteen are prohibited from using mobile phones)

Web Title : Children under the age of eighteen are prohibited from using mobile phones

Local ad 1