The Chikhlikar family met Prime Minister Narendra Modi
Share
नांदेड : खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MP pratap patil chikhalikar) यांनी गुरुवार 29 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. (The Chikhlikar family met Prime Minister Narendra Modi)
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमाच्या वेळापत्रकां मधून चिखलीकर कुटुंबियांना खास वेळ देऊन विकास प्रश्नांबाबत चर्चा केली. ही भेट अर्धा तासाहून अधिक वेळ चालली. खासदार चिखलीकर (MP pratap patil chikhalikar) यांनी सादर केलेल्या सर्व मागण्या तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारे विकासाचे प्रकल्प व इतर मागण्या याची नोंद पंतप्रधान मोदी यांनी घेऊन हे सर्व विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ही पंतप्रधानांनी दिल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान हॉस्पिटल (एम्स) (Aims hospital), नांदेड- बिदर रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू व्हावे, (Nanded bidar railway line) तसेच नांदेड जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी नवीन उद्योगधंदे व प्रकल्प मंजूर करावेत. बोधन- मुखेड -लातूर रोड या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी. (bodhan mukhed latur road relive line) नांदेड -चंदीगड- व्हाया -दिल्ली ही विमानसेवा (Nanded- delhi-chandigarh airlines) सुरू करावी. या सर्व मागण्यांचे लेखी निवेदन त्यांनी पंतप्रधानांना सादर केले.
The Chikhlikar family
यावेळी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत चिखलीकर कुटुंबीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन केले. यावेळी खासदार चिखलीकर यांच्या समवेत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पाटील, मुलगी प्रणिताताई देवरे-चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर , स्नुषा वैशाली पाटील , डॉ. माया प्रमोद पाटील, नातू अर्णव , राजवीर, आरुष, विहान या भेटीच्या वेळी उपस्थित होते. (The Chikhlikar family met Prime Minister Narendra Modi)