शिवसेना पक्ष आणि चिन्हं मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, काय ते जाणून घ्या..
मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर युक्तिवाद सुरु होता. अखेर या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याच गटाला शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Chief Minister Eknath Shinde’s reaction after receiving Shiv Sena party and symbols)
निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का : एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळाले
“
लोकशाहीचा हा विजय असून, भारतीय राज्य घटनेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. त्यांचा संकल्प आणि विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केले आहे. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो”, अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली. “लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असतं. आज सत्याचा विजय आहे. शिवसेनेने जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे”, असे देखील एकनाथ शिंदे यांवेळी म्हणाले. (Chief Minister Eknath Shinde’s reaction after receiving Shiv Sena party and symbols)
“बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेल्या निर्णयांशी एकरुप झालेल्या आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिक यांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. आमचे सरकार नियम आणि कायद्याने स्थापन झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मेरीटवर आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Chief Minister Eknath Shinde’s reaction after receiving Shiv Sena party and symbols)