औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण
मुंबई : औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) होते. (Chhatrapati Sambhajinagar of Aurangabad and Dharashiv of Osmanabad)
नामकरणाबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. (Chhatrapati Sambhajinagar of Aurangabad and Dharashiv of Osmanabad)
हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबत कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगर विकास विभागाकडून अधिनियमाप्रमाणे करण्यात येईल़, असे स्पष्ट करण्यात आले. (Chhatrapati Sambhajinagar of Aurangabad and Dharashiv of Osmanabad)
लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण (D.B.Patil Navi Mumbai Airport Naming)