...

सोनोग्राफी सेंटरर्स आणि रुग्णालयांची झाडाझडती घ्या !

पुणे. दौंड तालुक्यातील गोपाळवाडी एका उकिरड्यावर प्लॅस्टिक बरण्यांमध्ये मृत अर्भके व मानवी अवयव आढळून आले होते. त्यामुळे बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याचे विधानसभा अधिवेशनात ही पडसाद पाहायला मिळाले होत.

पुणे. दौंड तालुक्यातील गोपाळवाडी एका उकिरड्यावर प्लॅस्टिक बरण्यांमध्ये मृत अर्भके व मानवी अवयव आढळून आले होते. त्यामुळे बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याचे विधानसभा अधिवेशनात ही पडसाद पाहायला मिळाले होत. राज्य महिला आयोगाने दखल घेत अहवाल मागविला होता. मात्र, अधिकृत सोनोग्राफी सेंटरमधून गर्भ लिंग निदान चाचणी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटरची झाडाझडी घ्यावी, यामध्ये दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील (Youth Congress State General Secretary Rohan Suravase Patil) यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Health Minister Prakash Abitkar) यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे केल आहे. (Check out sonography centers and hospitals)

 

 

सुरवसे यांनी आरोग्य मंत्री आबिटकर यांना दिलेल्या निवेदनात दौंड तालुक्यात उघडकीस आलेल्या अर्भक आणि मनवी अवयांचा दाखला दिला आहे. या घटनेवरुन पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात सोनोग्राफी सेंटरमध्ये (Sonography Center) बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान चाचण्या होत आहेत व अमानुष पद्धतीने गर्भपात घडवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीभ्रूण हत्या जास्त प्रमाणात आहे. पुणे शहर, पिंपरी- चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी होणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषः सातारा जिल्ह्याच्या सीमेवर रुग्णवाहिकेत अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यामुळे अशा घटांनावर आरोग्य विभागाचे लक्ष असणे आवश्यक आहे.

 

 

पुणे शहर व जिल्ह्यासह राज्यातील सर्वच सोनोग्राफी सेंटरची तसेच हॉस्पिटलची तपासणी करण्यात यावी. अवैधपणे गर्भलिंनिदान (Fetal gender diagnosis) करून गर्भपात करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. बऱ्याचदा सोनोग्राफी सेंटरची तपासणी ही केवळ कागदोपत्री होत असते. प्रत्यक्षामध्ये तपासणी होणे व दोषी आढळणाऱ्या केंद्रांवर कारवाई होणे गरजेचे आहे. गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची (पीसीपीएनडीटी) कडक व प्रभावी अंमलबजावणी करून गर्भपात करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर, हॉस्पिटल व यामध्ये सहभागी असणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरवसे यांनी केली आहे.

 

Local ad 1