...

Nanded Panvel Express । नांदेड-पनवेल एक्सप्रेस अखेर पाच तास उशिराने पोहोचली पुण्याला

प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Nanded Panvel Express । पुणे : कुरुडवाडी आणि दौंडच्या दरम्यान, लोहमार्गावर काम सुरु असल्याने Nanded-Panvel Express मार्ग बदल्यानात आला आहे. याचा फटका प्रवशांना बसत आहे. त्यामुळे येत्या 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या परिक्षा होणार आहेत. त्यामुळे परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता येणार नाही. त्यामुळे परिक्षेसाठी किंवा वेळेत पोहोचाव लागणार अशा कामासाठी पुणे, मुंबईला येणार असाल तर प्रवासाठी इतर पर्यायांचा वापर करणे योग्य आहे. गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजता पोहोचणारी रेल्वे साडे अकरा वाजता पोहोचली आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Changes in the route of Nanded-Panvel Express)

 

 

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिक पुणे, मुंबईला मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. ही बाब लक्षात घेऊन दररोज रेल्वे सुरु करा, अशी मागणी होती. त्यानुसार  Nanded-Panvel Express ही रेल्वे सुरु करण्यात आली. त्याचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
नांदेड – पुणे -पनवेल (Nanded Panvel Express Railway) ही रेल्वे प्रवाशांना चांगला पर्याय ठरली. मात्र, कामामुळे या रेल्वेचा मार्ग तात्पुरता बदलण्यात आला. सध्या मिरज मार्गे ही रेल्वे धावत आहे, त्या मार्गावर मालवातूक करणाऱ्या रेल्वेला महत्त्व देऊन नावात एक्सप्रेस असूनही, ती पॅसेंजरच्या धर्तीवर थांबवले जात आहे. त्यामुळे  निर्धारित वेळेच्या सुमारे पाच ते सहा तास उशिराने धावत आहे. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करून वेळ घालवण्यापेक्षा अन्य पर्यायांचा वापर केल्यास तुम्ही इच्छित स्थळी वेळेत पोहोचाल. (Changes in the route of Nanded-Panvel Express)
नांदेड-पनवेल एक्सप्रेस ही नेहमीच्या नांदेड, परभणी, परळी, लातूर रोड, उस्मानाबाद, कुरुडवडी, दौड, पुणे, पनवेल या मार्गावरून धावते. नांदेड येथून सायंकाळी साडेपाच वाजता निघालेली ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहा वाजता पुणे स्टेशनवर पोहोचते. त्यामुळे प्रवाशांना ही रेल्वे सोयीची ठरते. मात्र, सध्या या ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. (Changes in the route of Nanded-Panvel Express)
https://www.mhtimes.in/changes-in-the-route-of-nanded-panvel-express/
नांदेड- पनवेल एक्सप्रेस ही सकाळी सव्वा सहा वाजता पुणे तर सकाळी साडेनऊ वाजता पनवेल येथे पोहोचण्याची वेळ आहे. सकाळी सव्वा आठ वाजता वृत्त लिहीत असताना ही ट्रेन सातारा येथे पोहोचली आहे. पुण्याला पोहोचण्यासाठी अजून किमान तीन तास लागतील असा अंदाज आहे. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करायचा की नाही, हे ठरविण्याची वेळ आली आहे.  (Changes in the route of Nanded-Panvel Express)

आरोग्य विभागाच्या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांची परीक्षा पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे परीक्षा सकाळी दहा वाजता आहे, ही रेल्वे सकाळी सव्वा सहा वाजता पोहोचते. आपण वेळेत पोहोचू या अपेक्षेने अनेक उमेदवारांनी पुण्याला येण्याचे रिझर्व्हेशन केले आहे. मात्र, रेल्वेचा मार्ग बदलला आहे, त्यामुळे वेळेत पोहोचणे शक्य होणार नाही, त्यामुळे आताच प्रवासाचे नियोजन करा,  अन्यथा परीक्षेला मुकाल..  (Changes in the route of Nanded-Panvel Express)

रेल्वे मार्ग अपडेट नाहीच

रेल्वे सध्या कुठपर्यंत आहे, निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, याची माहिती मोबाईल aap मध्ये पाहत असतात. परंतु, सध्या Nanded-Panvel Express ही रेल्वे मिरज मार्गे पुणे येत आहे, याची माहिती aap मध्ये अपडेट करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना अडचण निर्माण होत आहे.

 

 

Local ad 1