...

 इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत : बदल 

नांदेड :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा दिनांक 4 ते 30 मार्च 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यानुसार परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Partial change in the schedule of Class XII examination)

 

या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावी परीक्षेतील अर्धमागधी (16) या विषयासह अन्य विषयांची परीक्षा 7 मार्च रोजी दुपारी 3 ते 6.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. याविषयापैकी फक्त अर्धमागधी (16) या विषयाच्या वेळापत्रकामध्ये अशंत: बदल करण्यात आला आहे. (Partial change in the schedule of Class XII examination)
यापूर्वी अर्धमागधी (16) या विषयासाठी वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला तपशिल पुढील प्रमाणे आहे. सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी दुपारचे सत्र 3 ते 6.30 वाजेपर्यंत विषय सांकेताक अर्धमागधी (16) या विषयासाठी सुधारित तपशिल मंगळवार 8 मार्च 2022 दुपारी 3 ते 6.30 वाजेपर्यंत विषय साकेतांक अर्धमागधी (16) आहे. (Partial change in the schedule of Class XII examination)

इयत्ता 12 वी लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे. (Partial change in the schedule of Class XII examination)

Local ad 1