पुणे Weather update : आता परतीच्या प्रवासाची प्रतिक्षा असून, पुढील दोन दिवस म्हणजेच 20 आणि 21 सप्टेंबर (20 and 21 September) या कालावधीत मराठवाडयातील पाच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. (Chance of heavy rain for two days in Marathwada)
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 20 आणि 21 सप्टेंबर रोजी (20 and 21 September) मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापैकी 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Chance of heavy rain for two days in Marathwada)