...

Cathlab । नांदेड, पुणे, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब

Cathlab । मुंबई  : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. (Cathlab will be held at Nanded, Pune, Jalna, Gadchiroli District Hospital)

 

ई-कॉशेस मोबीलिटी इलेक्ट्रीक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

            पुणे, गडचिरोली, जालना आणि नांदेड जिल्हा रुग्णालयामध्ये नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता ३२ कोटी २३ लाख वीस हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या चारही रुग्णालयात स्थापत्यविषयक कामकाज करण्यासाठी सहा कोटी आणि यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी २६ कोटी २३ लाख आणि वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (Cathlab will be held at Nanded, Pune, Jalna, Gadchiroli District Hospital)

 

जनतेचा विश्वास संपादन करा,  असे  उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले जाणून घ्या..

Local ad 1