Cataract-Free Pune Walkathon । पुण्यात “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉन”चे आयोजन 

Cataract-Free Pune Walkathon । :  दादा लेझर आय इन्स्टिट्यूट (Dada Laser Eye Institute in Camp,Pune) च्या वतीने मोतीबिंदू द्वारे येणाऱ्या अंधत्वास (cataract blind) रोखण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावण्या सारख्या गंभीर परिणामाबद्दल जागरूकता आणण्यासाठी एक मोहीम सुरू केली जाणार आहे.

 

 

 

 

द अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी ( American Academy of Ophthalmology) आणि ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (All India Ophthalmological Society) यांनी जून २०२३ हा “मोतीबिंदू जागरूकता महिना” म्हणून घोषित केला आहे.

 

Maharashtra SSC Result 2023 Live Updates । दहावीच्या निकालाविषयी महत्वाची बातमी

 

 

दादा लेझर आय इन्स्टिट्यूटचे संचालक  डॉ. जीवन लाडी, १ जून २०२३  पासून मोतीबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वास टाळण्यासाठीच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. ज्यात डीएलईआय (DLEI)  चे उदिष्ट आहे १०,००० नागरिकांना मोफत मोतीबिंदू चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचे मुल्य आहे १००० रूपए म्हणजेच ते एकून १ कोटी रूपयांच्या निशुल्क तपासनी करण्याचा निश्यच केला आहे.

 

 

दादा लेझर आय इन्स्टीट्यून ने रविवारी  (४ जून २०२३)  “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉन” (Cataract-Free Pune Walkathon) चे आयोजन केले आहे. या वॉकथॉनची सुरुवात  सकाळी ७.३० वाजता साधू वासवानी रोडवरील साधू वासवानी पुतळ्यापासून  होईल आणि गुलमोहर अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, येथे असलेल्या दादा लेझर आय इन्स्टिट्यूट येथे या वॉकथॉनची समाप्ती होईल.
यावेळी  प्रमुख पाहुणे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील आणि आर.जे संग्राम खोपडे बिग एफ.एम यांच्या हस्ते या वॉकथॉनला हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि यातील समाजाच्या सहभागाचे महत्त्व पटवून देण्यात येईल. या मोतीबिंदू अंधत्व निवारणाच्या जनजागृतीसाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डीएलईआय कडून करण्यात आले आहे.

 

 

“कॅटरॅक्ट वॉकथॉन” आणि मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीमध्ये सहभागी होण्यासाठी, त्वरीत नोंदणीसाठी (३०  जून २०२३ पूर्वी) इच्छुक ९९२२९९५५४९ या डीएलईआयच्या  अधिकृत क्रमांक वर कॉल करू शकतात. या मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीसाठी लवकर नोंदणी करणाऱ्यांना किंवा शस्त्रक्रियेसाठी देखील २० टक्के सवलत मिळेल.
“वॉक टू अव्हॉइड कॅटरॅक्ट ब्लाईंडनेस” – कॅटरॅक्ट फ्री- पुणे वॉकथॉनची  ही या वॉकथॉनची थीम असुन – मोतीबिंदू-संबंधित अंधत्व टाळण्यासाठी आणि आपल्या जनसमुदायामध्ये डोळ्यांच्या  आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी  ही मोहीम निश्चीतच आवश्यक आहे.
“मी ही मोहीम गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यासाठी, त्यांना निरोगी दृष्टीची भेट देण्यासाठी आणि त्यांना स्पष्ट आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी सक्षम बनवण्याची संधी मिळावी यासाठी सुरू केली आहे. आणि माझा ठाम विश्वास आहे की विशेषत: जेव्हा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेने मोठा फरक पडू शकतो तेंव्हा  कोणालाही या  टाळता येण्याजोग्या अंधत्वाचा त्रास होऊ नये, या मोहिमेद्वारे, मोतीबिंदूबद्दल जागरुकता वाढवणे, लवकर निदानास प्रोत्साहन देणे आणि मोतीबिंदू-संबंधित अंधत्वाविरुद्धच्या लढ्यात कोणीही मागे राहू नये हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे“, अशी माहिती  डीएलईआय चे संस्थापक डॉ. जीवन लाडी यांनी दिली.
मोतीबिंदू हे जगभरातील अंधत्वाचे एक प्रमुख कारण बनले आहे, भारतातील ८० टक्के पेक्षा जास्त अंध व्यक्तीं या अवस्थेतून जातात. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील अंदाजे ३८ लाख लोक दरवर्षी मोतीबिंदू मुळे अंध बनतात, ज्यामुळे देशातील १ कोटी २०  लाख अंध व्यक्तींची संख्या  हा चिंताजनक  विषय आहे.
Local ad 1