नाशिक : महसूल सप्ताह सुरू असतानाच 15 लख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या नाशिकच्या लाचखोर तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरमच्या घरातून मोठे घबाड सापडले आहे. त्यात साडेचार लाख रुपयांची रोकड (Tehsildar Naresh Kumar Tukaram Bahiram) आणि 40 तोळे सोने सापडल्याची माहिती सुत्रांनी दिली. (Cash gold found in Nashik Tehsildar’s house)
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Home Minister Devendra Fadnavis, Construction Minister Dada Bhuse, Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) हे नाशिक दौऱ्यावर असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Department Nashik) (एसीबी) सापळ्यात बहिरम अडकला आहे. (Cash gold found in Nashik Tehsildar’s house)
बहिरम याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एसीबीच्या पथकाने लाचखोर बहिरमच्या घराची झाडाझडती घेतली आहे. बहिरम हा फ्लॅट नंबर ६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर येथे राहतो. त्याचा घराची झाडाझडती घेतली असता एसीबीच्या पथकाला सोने आणि रोकड मिळून आले.
काय आहे प्रकरण
राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये बेकायदा मुरुम उत्खनन केले जात आहे. त्याला पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० दंडाची नोटिस तहसील कार्यालयाने जागा मालकाला बजावली होती. या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यात मदत करण्यासाठी बहिरमने १५ लाख रुपयांची लाच मागितली. ती लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.
१५ लाखाची लाच घेतांना रंगेहात सापडलेला तहसिलदार बहिरम याच्या घरात ४० तोळे सोने सापडले आहे. या सोन्याची बाजारातील किंमत २४ लाख ४८ हजार रुपये एवढी आहे. तसेच, त्याच्या घरामध्ये ४ लाख ८० हजार रुपयांची रोकड ही सापडली आहे. आता त्याचे बँक खाते, बँक लॉकर, अन्य स्थावर मालमत्ता (Bank Account, Bank Locker, Immovable Property) या सर्वांचीच झडती एसीबीकडून घेतली जाणार आहे, असल्याचे सांगण्यात आले.