...

भर रस्त्यावर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा ; आरोपिचा माफीनामा

पुणे. एका धनाढ्य कुटुंबातील तरुणाने रात्रभर दारू पार्टी केल्यानंतर शनिवारी (दि. ८ मार्च) सकाळी येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात भर रस्त्यावर गाडी थांबवून लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ मिळवून संशयित आरोपींची ओळख पटवली असून, त्यांच्यावर अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाग्यश ओसवाल या २२ वर्षिय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. (Case filed against two youths for obscene behavior on the street)

 

ससुन रुग्णालयातील वर्ग – 4 मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६८/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम २७०, २८१, २८५, ७९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११२, मोटार वाहन कायदा १८४, १८५ आणि दारूबंदी कायदा कलम ८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय घडलं नेमकं?

शनिवारी सकाळी ७.३० वाजता शास्त्रीनगर चौकात दोन तरुणांनी नशेच्या अवस्थेत आपली गाडी (MH 12 RF 8419) रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली. त्यानंतर त्यापैकी एकाने भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करत अश्लील वर्तन केले. शिवाय, नशेत असलेल्या या तरुणांनी वेगाने वाहन चालवून सार्वजनिक उपद्रव निर्माण केला.

 

Case filed against two youths for obscene behavior on the street

 

एकाला अटक, दुसरा फरार

या प्रकरणात भाग्यश ओसवाल याला अटक (Bhagyash Oswal arrested) करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर दुसरा आरोपी गौरव आहुजा (Gaurav Ahuja) हा सध्या फरार असून, पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी अशा बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. येरवडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

आरोपीचा माफिनामा

दरम्यान मुख्य आरोपी गौरव आहुजा हा हात जोडून म्हणतोय, नमस्कार मी गौरव आहुजा राहणार पुणे, माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य घडले, ते कृत्य खूप चुकीचे होते. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो, संपूर्ण जनता, पोलीस विभाग आणि शिंदे साहेब, या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.

गौरव आहुजा याच्या हॉटेलबाहेर आंदोलन

दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा याचे स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात क्रीम किचन नावाने बिअर बार हॉटेल आहे. त्या हॉटेलबाहेर गुलाबो गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गौरव आहुजा याच्या फोटोला जोडे मारून आणि त्याचा फोटो जाळण्यात आला. यावेळी हॉटेल मध्ये काही लोक दारू पीत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

 

 

Local ad 1