नांदेड जिल्ह्यातील “त्या” 32 मुलांवर ऱ्हदयाची शस्त्रक्रिया
जिल्ह्यातील रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी ः खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
जिल्ह्यात व्यापक तपासणी मोहिम हाती घेतली गेली. यात सुमारे 32 बालकांना शस्त्रक्रिया करण्याची अत्यावश्यकता लक्षात घेऊन त्यांना धीर देऊन आज वर्धा आणि नागपूरकडे रवाना केले. (Cardiac surgery on “those” 32 children in Nanded district)
व्यापक मोहीम नांदेड जिल्ह्याचा विस्तार घेऊन राबविणे व यातून ही गरजवंत मुले निवडून तातडीने त्यांना शस्त्रक्रियेसाठी व पुढील उपचारासाठी पाठविणे अत्यंत गरजेचे होते. कोविड-19 मध्ये गत दोन वर्षाच्या गेलेला कालावधी लक्षात घेता आम्ही प्राधान्याने मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन यासाठी नियोजनबद्ध वेळेत सामुहिक प्रयत्न केल्यामुळे आता ही मुले सदृढ हृदय घेऊन परतील अशी भावूक प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केली. (Cardiac surgery on “those” 32 children in Nanded district)
श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या समारंभास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, या योजनेचे समन्वयक तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश वाघमारे, बालरोग तज्ज्ञ डॉ. बजाज, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी शिवशक्ती पवार, जिल्हा शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक अनिल कांबळे, डॉ.अनिल रुईकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Cardiac surgery on “those” 32 children in Nanded district)
सदरील मुले उपचारासाठी रवाना करण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्वत: तपासणी करून बालक व त्यांच्या पालकांना उपचाराबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य सेवेबाबत वेळोवेळी दक्षता घेऊन याबाबत निर्देश दिलेले आहेत. या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील या उपक्रमात अधिकाधिक मुलांना समावून घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकांनीही कोणाच्या मुलांना जर आजार असेल तर पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. (Cardiac surgery on “those” 32 children in Nanded district)
उपचारासाठी पाठविण्यात आलेले तालुका निहाय मुलेउपचारासाठी पाठविण्यात आलेल्या मुलांमध्ये भोकर तालुक्यातील 5, किनवट तालुक्यात 8, नांदेड तालुक्यातील 1, हदगाव तालुक्यातील 1, लोहा 3, कंधार 4, मुखेड 1, देगलूर 2, बिलोली 3, धर्माबाद 3, आणि उमरी येथील 1 मुलांचा समावेश आहे. यातील 6 बालक नागपूर येथील नेल्सन हॉस्पिटल येथे उपचारासाठी तर 26 बालक हे वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले आहेत. या सर्व मुलांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येत आहेत.