‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानातून धक्कादायक माहिती आली समोर.. महिलांमध्ये रक्तदाबासह कर्करोगाची लक्षणे आढळली

पुणे : महिलांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादाय माहिती ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानात (‘Mother is safe if home is safe’ campaign) समोर आली आहे. त्यात राज्यातील ४ लाख १९ हजार ४९६ महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्राथमिक निदान अभियानात केलेल्या तपसाणी झाले आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. (Cancer symptoms were found along with blood pressure in women)

 

 

तपासणीमध्ये १ लाख १८ हजार १५९ गरोदर महिलांना उच्च रक्तदाबाची प्राथमिक लक्षणे (Primary symptoms of high blood pressure) दिसून आली आहेत. तर १ लाख १३ हजार २०१ महिलांना रक्ताक्षयाचे निदान झाले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील १८ वर्षावरील महिला, गरोदर माता यांच्या आरोग्या तपासणीसाठी राज्यात सप्टेंबरपासून माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाला सुरूवात झाली होती. (Cancer symptoms were found along with blood pressure in women)

 

 

सप्टेबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यातील ४ कोटी ३९ लाख ३ हजार ९८३ महिलांची तपासणी करण्यात आली आहे. कर्करोगाचेसहसंशयीत ६१ हजार ७२९ महिलांमध्ये लक्षणे दिसून आली आहेत. हृद्यासंबंधी आजाराचे ३३ हजार ९७० महिलांमध्ये निदान झाले आहे. (Cancer symptoms were found along with blood pressure in women)

 

 

गर्भाशय आणि मुख कर्करोगाची लक्षणे २१ हजार ३२ महिलांमध्ये लक्षणे दिसून आली आहेत. या महिलांना औषधोउपचार आणि समुपदेशन देखील करण्यात आले आहे. याचबरोबर कान-नाक-घसा, कर्करोग, हृद्यरोग, मोतिबिंदू, या आजारांची तपासणी करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका यांच्या मार्फत घरोघरी जाऊन आरोग्या विषयी माहिती देण्यात येत आहे. (Cancer symptoms were found along with blood pressure in women)

 

अभियानात केलेल्या तपासणीत २ लाख ५७ हजार १३८ महिलांना मधुमेहाचे प्राथमिक निदान झाले आहे. महिलांमध्ये रक्तदाबानंतर मधुमेह हा सर्वाधिक आढळून येणारा आजार असल्याचे समोर आले आहे. आपल्याला नेमका का आजार आहे, याची अनेकांना कल्पना नसते. त्यामुळे या अभियानाअंतर्गत महिलांची तपासणी करून त्यांना औषधोउपचार देण्यात येत आहे.

 

 

साठ वर्षावरील महिलांमध्ये कान-नाक-घसा (Ear-Nose-Throat) या आजारांचे प्रमाण जास्त प्रमाणात आडळून येत असते. त्यामुळे या अभियानाअंतर्गत साठ वर्षावरील १४ लाख ८ हजार सात महिलांच्या कान-नाक-घसा तपासणी करण्यात आली आहे. तसेच साठ वर्षावरील ११ लाख ६८ हजार ९५३ महिलांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

Local ad 1