Maharashtra Political crisis : 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करा, शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी
Maharashtra Political crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे. (Cancel the membership of 12 MLAs Shiv Sena’s demand to the Assembly Vice President)
खासदार सावंत म्हणाले, जे काही आकडे दाखवले जात आहेत, ते चुकीचे असून, आम्ही दोन बैठका घेतल्या आहेत. नवनिर्वाचित गटनेते अजय चौधरी व प्रतोद यांनी व्हीप जारी केला होता. त्यास काही जणांनी उत्तर दिले आहे, मात्र, यात काही खोटी कारणे दिली आहेत. (Cancel the membership of 12 MLAs, Shiv Sena’s demand to the Assembly Vice President)
कोण आहेत ही 12 आमदार
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, महेश शिंदे, अनिल बाबर, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी किणीकर आणि लता सोनावणे यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिले उत्तर
एकनाथ शिंदे यांनी आमदारांवरील कारवाईनंतर ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय ? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या 10 व्या परिशिष्टा प्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही, अशा शब्दात उत्तर दिले आहे.