UPSC। युपीएससी परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची संधी
UPSC । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Central Public Service Commission) नागरी सेवा (Civil Service) परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन (Dr.K.S.Jain, Director, Institute of Administrative Business Education) यांनी दिली आहे. (Call to Apply for UPSC Exam Coaching)
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत (Department of Higher and Technical Education) राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (Nashik, Kolhapur, Aurangabad, Amravati and Nagpur, Yashwantrao Chavan Development Administration Prabodhini) संचलित डॉ.आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (Dr. Ambedkar Competitive Examination Guidance Centre), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporation) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी (Savitribai Phule Academy), पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (Central Public Service Commission Civil Services Prelims Examination) २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
ऑन लाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे. (Call to Apply for UPSC Exam Coaching)