Pune Cantonment Board । कत्तलखाना बंद केल्याने व्यावसायिकांचे कॅन्टोन्मेंट बोर्डात आंदोलन

Pune Cantonment Board पुणे : पुणे कँटोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीतील  कत्तलखाना (कमेला)  कायमस्वरूपी बंद केले आहे. हा कत्तलखाना पुन्हा सुरु करावा, या मागणीसाठी लष्कर भागातील खाटिक व्यावसायिकांनी सोमवारी  कॅन्टोन्मेट बोर्ड कार्यालयात धरणे आंदोलन केले आहे. (Businessmen’s agitation in Cantonment Board due to closure of slaughterhouses)

 

लष्कर भागातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये (Chhatrapati Maharaj Shivaji Market) खाटीक व्यावसायिकांचे (Khatik professional) मार्केट आहे. जनावरांची कत्तल करण्याकरिता मागील १२५ वर्षाहून जास्त कालावधीपासून कोंढवा रस्त्यावर कत्तलखाना सुरू आहे. यावेळी हा कत्तलखाना बंद करून पुणे महपालिकेच्या कत्तलखान्यात कँटोन्मेंटच्या व्यवसायिकांकरिता सोय करावी, अशा आशयाचे विनंती पत्र नुकतेच बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांनी महापालिका आरोग्य विभागाकडे केली होती.

 

Pune Ring Road। पुणे रिंगरोडला शेतकरी  का करतायेत विरोध ? ग्रामस्थांनी अडवला महामार्ग

 

बोर्डाच्या या पत्राला अनुसरून महापालिकेने २५ एप्रिल रोजी ठराव मान्य केले. महापालिकेच्या जनावरांची कटाई झाल्यानंतर या जनावरांची कत्तल करण्याची अनुमती कॅन्टोन्मेंटला  दिली होती. स्थायी समितीच्या ठरावात मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी ८० रुपये तर लहान प्रत्येकी दोन जनावरांसाठी  ३० रुपये प्रमाणे दर निश्चित केले. तसेच त्या जनावरांची घेऊन जाण्याची जबाबदारी ही कँटोन्मेट बोर्डाची राहिल, असे पत्रक बोर्डाला मनपाने पाठवले होते.

 

 

 

ऑल इंडिया जमियतुल कुरेश ॲक्शन कमिटीचे  (All India Jamiatul Quresh Action Committee) शहर अध्यक्ष हसन कुरेशी (Hassan Qureshi) म्हणाले, मनपाचे दर आम्हाला परवडणारे नाही, कत्तलखाना बंद करणे म्हणजे आमच्या नैसर्गिक न्याय तत्वाची पायमल्ली असुन, त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने भारताचे नागरिक म्हणुन आम्हाला बहाल केले आहे.

 

Businessmen's agitation in Cantonment Board due to closure of slaughterhouses ..

 

 

या निर्णयाविरूध्द आम्ही सदर व्यवसायाशी निगडीत असणारी सर्व मंडळी यांनी सनदशीर मार्गने न्याय मिळवण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असताना कत्तलखाना बंद करणे योग्य नाही. त्यामुळे कत्तलखाना परस्पर बंद करण्याचा घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा सनदरशीर व कायदेशीर मार्गाने लोकशाहीला अभिप्रेत असणान्या तत्वानुसार तीव्र आंदोलन करू, असा इशारा कमिटीने पत्रकाद्वारे दिला आहे.

 

 

यावेळी कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी, पुणे शहर अध्यक्ष हसन कुरेशी, उपाध्यक्ष. आरिफ कुरेशी, सेक्रेटरी. महमूदलाल कुरेशी, मुनव्वर कुरेशी, आरिफ चौधरी, अनिस कुरेशी, हाजी इकबाल कुरेशी, हाजी इर्शाद पटेल, इरफान कुरेशी, हाजी बिलाल कुरेशी, आबू सुफियान कुरेशी, हाजी मोईनुद्दीन कुरेशी, हाजी अबरार कुरेशी, फारुख कुरेशी आदी आंदोलन प्रसंगी उपस्थित होते.

Local ad 1