Nashik Bus Accident : शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक येथे एका बसला भीषण आग लागली, यात 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 21 प्रवासी जखमी असून, त्यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (bus fire in Nashik; 10 people lost their lives)
नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास बसमधील (Nahik Bus Accident) अनेक प्रवासी झोपेत असतानाच काळाचा घाला आला. खाजगी बसला आग लागून 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यानंतर घटनेची माहिती आगीसारखी पसरली. त्यावेळी काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले.
आग दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी गंगाठरन डी (Nashik Collector Gangatharan D) यांनी दिली आहे. तर 21 प्रवासी जखमी असून, यापैकी एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचले असून पाहणी केली जात आहे. (bus fire in Nashik; 10 people lost their lives)
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बस आगीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसाह्य केले जाईल अशी घोषणा केली आहे. (bus fire in Nashik; 10 people lost their lives)