अन् जावायाच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचले (Buldhana crime)

कधी? कुठे? कोणी? वाचा सविस्तर...

बुलडाणा : पुण्याहून (pune) पत्नीला नेण्यासाठी आलेल्या 22 वर्षीय पतीला सासरकडील मंडळीने अमानुष मारहाण केल्याचा घृणास्पद घटना बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील मोताळा येथून समोर आली आहे. जावयाच्या (son-in-law) पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचून मारहाण केल्याची तक्रार जावयाने बोरखेडी पोलिसात केली आहे. या प्रकरणात सासरकडील 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (A case has been registered against 11 persons belonging to the father-in-law) यापैकी 4 जणांना अटक देखील पोलिसांनी केले आहे. buldhana crime news

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील येथील 22 वर्षीय पीडित विवाहित युवक हा त्याच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कॉटन मार्केटनजीकच्या परिसरात आला होता. यावेळी मोताळा येथील रहिवासी आरोपी रामराव भाऊराव पवार, विजय रामराव पवार, रवी रामराव पवार, राजू रामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेवाबाई, कलुबाई व देवानंद रामभाऊ मोहिते या 11 जणांनी पीडित युवकाचे हातपाय दोरीने बांधून अंगणात बांधून ठेवले. व पीडित युवकाच्या अंगातील फुलपॅन्ट व अंडरवेअर काढून त्याच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचले. buldhana crime news

 

शिवाय शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, केबलच्या वायरने पाठीवर व कंबरेवर अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे लज्जा वाटून खूप वेदना झाल्या, अशी तक्रार पीडित युवकाने तक्रारी बोरखेडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पीडित युवकाच्या तक्रारीवरून उपरोक्त 11 आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून 4 जणांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करीत आहेत. buldhana crime news

 

मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ राहत असलेल्या रामभाऊ भाऊराव पवार यांच्या मुलीशी मे 2020 मध्ये लग्न झाले आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्याआधीपासून पीडित युवक आणि त्याच्या पत्नीच्या वाद सुरू होते. म्हणून ती तेव्हापासून मोताळा येथे माहेरी राहत होती आहे. दरम्यान काही दिवसा अगोदर पीडित युवक काही लोक सोबत घेऊन सासरीकडील मंडळीसोबत वाद घातला होता. buldhana crime news

Local ad 1