(Maharashtra Budget 2021) अर्थसंकल्प : मद्याच्या किंमती वाढणार

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) सादर केला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात राज्यात देशी बनावटीच्या ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मद्यावरील व्हॅटमध्ये पाच टक्क्यांची वाढ केली असून, ते ६० टक्क्यांवरुन ६५ टक्के करण्यात आला आहे.

तर सर्व प्रकारच्या व्हॅटचा दर ३० टक्क्यांवरुन ४० टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आता मद्य महागणार आहे. (Maharashtra Budget 2021 five percent increase in VAT on alcohol)

राज्याचं करसंकलनाचं उद्दिष्ट आणि आर्थिक गणित बसवण्यासाठी अजित पवारांनी मद्यावर करवाढ प्रस्तावित केली आहे. “देशी मद्याचे ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड असे दोन प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, देशी ब्रँडेड उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये प्रति प्रूफ लिटर यापैकी जे अधिक असेल तो लागू करण्यात येईल. त्यातून राज्याला अंदाजे ८०० कोटी अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे.

मद्यावरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूची ख नुसार सध्याचा मूल्यवर्धित दर ६० टक्क्यांवरून ६५ टक्के, तर मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ४१/५ नुसार मद्यावर सध्या असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर ३५ वरून ४० टक्के वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे राज्याला १ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल”, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. (Maharashtra Budget 2021)

Budget 2021
five per cent increase in VAT on liquor : Maharashtra Budget 2021
Local ad 1