डाॅ.अनिल अवचट यांचा अल्प परिचय

डाॅ. अनिल अवचट  (Dr. Anil Avchatयांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम. बी. बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला आहे. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले असून, आतापर्यंत  त्यांची २२ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. (Brief introduction of Dr. Anil Avchat)

 

 

डॉ. अनिल अवचट (Dr. Anil Avchat) यांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे.  अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये आवलंबली जाते. (Brief introduction of Dr. Anil Avchat)

 

 

मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळविणाऱ्या काही व्यक्ती : पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रमोद उदार, वगैरे. (Brief introduction of Dr. Anil Avchat)

 

  • पत्रकारिता

डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.

 

डाॅ. अनिल अवचट यांची साहित्य संपदा

  • अमेरिका (इ.स.१९९२)

  • अक्षरांशी गप्पा

  • आपले‘से’

  • आप्‍त (१९९७)

  • कार्यमग्न

  • कार्यरत (१९९७)

  • कुतूहलापोटी (२०१७)

  • कोंडमारा (१९८५)

  • गर्द (१९८६)

  • छंदांविषयी (२०००)

  • छेद

  • जगण्यातले काही (२००५)

  • जिवाभावाचे (२०१७, मौज प्रकाशन) – व्यक्तिचित्रे

  • दिसले ते (२००५)

  • धागे आडवे उभे (१९८६)

  • धार्मिक (१९८९)

  • People : ‘माणसं’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर]] (सहलेखक- विश्राम गुप्ते)

  • पुण्याची अपूर्वाई (२०१०)

  • पूर्णिया (१९६९)

  • प्रश्न आणि प्रश्न (२००१)

  • बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन

  • Beyond Work- Visionaries From Another India : ‘कार्यरत’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर)

  • मजेदार ओरिगामी

  • मस्त मस्त उतार (काव्यसंग्रह)

  • माझी चित्तरकथा

  • माणसं! (१९८०)

  • मुक्तांगणची गोष्ट पुस्तक : (इंग्रजीत Learning to Live Again)

  • मोर (१९८६)

  • रिपोर्टिंगचे दिवस

  • Learning to live again, “मुक्तांगण” पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर.

  • लाकूड कोरताना

  • वनात..जनात

  • वाघ्या मुरळी (१९८३)

  • वेध

  • शिकविले ज्यांनी

  • संभ्रम (१९७९)

  • सरल तरल

  • सुनंदाला आठवताना

  • स्वतःविषयी (१९९०)

  • सृष्टीत…गोष्टीत (२००७)

  • सृष्टी-दृष्टी, वनात-जनात (बालवाङ्मय)

  • हमीद (१९७७)

  • हवेसे

 

पुरस्कार

 

  • व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)[१]

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८)

  • महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार

  • २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार

  • “सृष्टीत.. गोष्टीत” या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार

  • [१]डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली आहेत.

  • अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.

  • सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).

  • साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.

  • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.

  • डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार

Local ad 1