मुंबई : सुमारे दोन वर्षांपासून प्रशासक असलेल्या कॅन्टोमेंन्ट बोर्डांचा (Cantonment Board) कारभार हा प्रशासकांच्या हती आहे. संरक्षण मंत्रालयाने एकूण 62 पैकी 57 कॅन्टोमेंन्ट बोर्डाच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्याची प्रक्रिया सुरु असतानाच सर्व निवडणूक प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Breaking News cantonment board elections postponed)
संरक्षण मंत्रालयातील सहसचिव राकेश मित्तल यांच्या स्वाक्षरीने आलेल्या पत्रात निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या (Cantonment Board Act 2006) अधिनियम ४१ च्या आधारे ही ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. त्याबाबत १८ फेब्रुवारीला राजपत्राद्वारे सूचना देण्यात आली होती. (Breaking News cantonment board elections postponed)
देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२१ बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. आतापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. आता अचानक निवडणूक रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Breaking News cantonment board elections postponed)
तब्बल सात वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने इच्छुक कामाला लागले होते. अनेकांनी आप आपल्या वार्डमधील नागरिकांच्या भेटी-गाठी घेत होते. तसेच सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली होती. तसेच उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावत होते. भाऊ आपली उमेदवारी पक्की आहे असे, सांगत होते. (Breaking News cantonment board elections postponed)