मोहम्मद पैगंबर (स) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान

पुणे : कॅम्प परिसरातील लेडी हवाबाई हाईस्कूल बाबजान चौक, येथे मोहम्मद पैगंबर (स) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर सीरत कमीटीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यात १०१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. (Blood donation on the occasion of the birth anniversary of Prophet Mohammad (s))

 

पुणे शहर सीरत कमीटीच्या वतीने मोहम्मद पैगंबर (स) यांच्या जयंतीनिमित्त बंड गार्डन रस्त्यावरील अनाथ आश्रमात हाजी नज़ीरभाई तांबोली धायरीवाले यांच्या हस्ते २०० मुलींना मिठाई वाटप करण्यात आले. त्याबरोबरच सिटी हॉस्पिटल या ठिकाणी सीरत कमीटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद क़ादरी व हाफ़िज़ एहतेशाम यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. (Blood donation on the occasion of the birth anniversary of Prophet Mohammad (s))

 

पुणे ब्लड बँकेचे डॉ. मयुरी लोखंडे व डॉ. कमलेश डिंबले यांची टीमचे सहकार्य लाभले. कार्यक्रमामध्ये सीरत कमीटीचे अध्यक्ष, मौलाना गुलाम अहमद कादरी, मौलाना निज़ामुद्दीन फखरुद्दीन उपाध्यक्ष, रफिऊद्दीन शेख सरचिटनिस, हाजी नज़ीर तंबोली धायरीवाले, सिराज बागवान, अतीक उस्ताद, काँगेस शहराध्यक्ष रमेश बागव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, सदानंद शेट्टी, हाजी उस्मान शेठ तंबोली, अहमद युनुस सय्यद, आसिफ शेख, फ़ैज़ अमीन शेख, हाजी शाहीद साबिर, जावेद खान, साबिरभाई, हाजी नदाफ़, मोहन जोशी, माजी आमदार, बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री उपस्थित होते.

 

मंगळवारी दुपारी ३ वाजता शासनाच्या निर्देशानुसार सीरत कमीटी तर्फे (पाच ट्रक व प्रत्येकी पाच लोकं) मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी ५ वाजता त्याची सांगता जामा मस्जिद (सीटी) शुक्रवार पेठ, येथे मौलाना गुलाम अहमद क़ादरी व मौलाना निज़ामुद्दीन फख़रुद्दीन याचे प्रवचन, प्रार्थना आणि सलाम पटनाने झाले. मौलाना हाफ़िज़ एहतेशाम यांनी आभार मानले. (Blood donation on the occasion of the birth anniversary of Prophet Mohammad (s))

Local ad 1