(Blast of corona patients in Pune; More than three thousand patients a day) धक्कादायक : पुण्यात कोरोना रुग्णांचा स्फोट
पुणे : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, शुक्रवारी पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. एकाच दिवसात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात मिळून 3 हजार 184 रुग्णांची वाढ झाली. तर, 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Blast of corona patients in Pune; More than three thousand patients a day)
रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंद लागू केले असून, त्याची प्रभावी अमंलबजावणी केली जाणार आहे. शुक्रवारी पुणे शहरात 1805 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी हि संख्या 1504 इतकी होती. त्यात शुक्रवारी आणखी 300 रुग्णांची भर पडली. शहरातचील आठ जणांचा मृत्यू झाला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 आणि ग्रामीण भागात 4 अशा एकूण 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Blast of corona patients in Pune; More than three thousand patients a day)
पिंपरी-चिंचवडमध्ये 855 तर ग्रामीण भागात 524 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आता पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 18 हजार 692 वर पोचली आहे. त्यापैकी 13 हजार 321 रुग्ण गृहवीलगिकरनात तर उरलेले 5 हजार 371 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. (Blast of corona patients in Pune; More than three thousand patients a day)