...

(BJP’s statewide agitation for resignation of Home Minister) गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे राज्यभर आंदोलन 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॅम्बनंतर विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षभाने राज्याभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले आहे. (BJP’s statewide agitation for resignation of Home Minister)

परमबीर सिंह  यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला. त्यावर आता विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून,  पुण्यात भाजपने अलका टॉकीज चौकात गृहमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले.  यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार खंडणीखोर असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. (BJP’s statewide agitation for resignation of Home Minister)

नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आंदोलन संविधान चौकात सुरू असताना अचानक भारतीय जनता युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते सिव्हिल लाइन्स परिसरातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा  जाळला.(BJP’s statewide agitation for resignation of Home Minister)

गृहमंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत अचानक सर्व सुरक्षा व्यवस्था फोल ठरवत थेट गृहमंत्र्यांच्या घराच्या दारासमोर हा आंदोलन केले आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये नेले आहेत. (BJP’s statewide agitation for resignation of Home Minister)

Local ad 1