kasba peth bypoll result live update : भाजपचा बालेकिल्ला ढासळला, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी

kasba peth bypoll result live update : कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. धंगेकर अकरा हजार 40 मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत (BJP’s Bale Killa Dhasalla, Congress’ Ravindra Dhangekar won)

 

तब्बल 30 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केले आहे. (BJP’s Bale Killa Dhasalla, Congress’ Ravindra Dhangekar won)

 

 

टपाली मतदाना पासून ते 20 व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांची आघाडी कायम ठेवत विजयी नोंदवला आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवाराला प्रभाग क्रमांक 15 मधून सर्वाधिक आघाडी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या ठिकाणी मतदारांनी  रासने यांना नाकारत धंगेकर यांच्या पदरात आपल्या मतदानाचे दान टाकले आहे. (BJP’s Bale Killa Dhasalla, Congress’ Ravindra Dhangekar won)

Local ad 1