पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काढलेल्या मोर्चात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली होती. त्यावरून महिला आयोगाने (Women’s Commission) चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांना नोटीस बजावली होती. त्याला पाटील यांनी उत्तर दिले आहे.(BJP state president Chandrakant Patil expressed regret)
“तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून, तुम्हांला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या”, अशा शब्दांत टिका केली होती. यातील काही शब्दांवर आक्षेप घेण्यात आला. यासंदर्भात महिला आयोगाने नोटीस बजावली होती. त्याला आता पाटील यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. (BJP state president Chandrakant Patil expressed regret)