भाजपला कर्नाटकचे नुकसान महाराष्ट्रातून भरून काढायचे : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर  

पुणे : भाजपला (BJP) कर्नाटकमध्ये विधानसभा (Karnataka Legislative Assembly) नुकसान होणार हे त्यांना माहीत होतं, झालेही तसेच. लोकसभा निवडणुकीतही त्यांना  तिथे फारस यश मिळेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे त्यांना कर्नाटकमध्ये होणारे नुकसान  महाराष्ट्रातून भरून काढायचं आहे, त्यामुळे ते विरोधकच संपवत आहेत, अशी टिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Adv. Prakash Ambedkar) यांनी केली. (BJP should make up for the loss of Karnataka from Maharashtra: Adv Prakash Ambedkar)

अ‍ॅड. आंबेडकर हे पुण्यात माध्यमांशी बोलत होते. अजित पवार (Ajit Pawar) हे एक स्मॉल प्लेअर असून, कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या आधी अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होत. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागा भारतीय जनता पक्षाला जिंकायचा आहेत. राज्यातील विरोधी पक्ष भाजपची ही स्कीम समजू शकले नाहीत, याच दुःख असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

राज्य सरकारला शेतकऱ्यांविषयी काही देणे घेणे नाही : ऍड प्रकाश आंबेडकर

दुर्दैवाने अजित पवार यांना यावेळेसची दिवाळी ही त्यांना एकट्यालाच साजरी करावी लागणार आहे. पण पुढच्यावर्षी ते दिवाळी कुटुंबांसोबत साजरी करतील, अशी आशा करू असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला आहे.

 

आजच्या राज्यातील राजकारण पाहता वंचितची काय भूमिका असेल, असे विचारले असता, ते म्हणाले, पुढील काळात आम्ही भाजप बरोबर राहणार नाही, हे मी निश्चित सांगतो. बाकी दुसर्‍याचंच कोणाबरोबर राहायचं हे ठरत नाही, त्यामुळे आमचं ठरत नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
Local ad 1