Chinchwad By-election Results : चिंचवड पोटनिवडणुकीची (Pune By-Poll Election) घोषणा झाल्यापासून चर्चेत होती. चिंचवड मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) भाजपने (BJP) गड राखला आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. (BJP retained the stronghold of Chinchwad, Ashwini Jagtap won by 36 thousand votes)
चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली असून, मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली. अश्विनी जगताप यांना 36 हजार 168 मतांच्या फरकाने विजयी घोषित करण्यात आले.
kasba peth bypoll result live update : भाजपचा बालेकिल्ला ढासळला, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदान झाले होते. म्हणजेच, 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी मतदान केले होते. चिंचवडमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली.