नांदेड : विधानसभा आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असून, भारतीय जनता पक्षाने सर्वच पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी आज राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख (election chief) जाहीर केले आहेत. त्यात लोहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रवीण पाटील चिखलीकर (Praveen Patil Chikhlikar) यांच्यावर सोपवली आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत. (BJP has selected the election chiefs of 288 assembly constituencies)