भाजपने जिल्हा आणि शहराध्यक्षांची केली घोषणा ; कोणाची झाली निवड जाणून घ्या

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चेंद्रशेखर बावनकुळे (State President of Bharatiya Janata Party Chandrasekhar Bawankule) यांनी राज्यातील (Maharashtra BJP) जिल्हा आणि शहराध्यक्ष यांची नियुक्ती घोषित केली आहे. (BJP announces district and city presidents; Find out who has been selected)

 

 

भाजप नांदेड जिल्हाध्यक्षांची निवड ; कंदकुर्ते, भोयर, हंबर्डे यांची निवड

 

शहर आणि जिल्हाध्यक्ष

विदर्भ विभाग : नागपूर शहर बंटी धनराज काकडे, नागपूर ग्रामीण सुधाकार विठ्ठलराव कोहळे, वर्धा – सुनील ज्ञानेश्वर गफाट, भंडारा प्रकाश हरी बाळबुधे, गोंदिया अॅड. यशुलाल हौशालाल उपराळे, गडचिरोली प्रशांत पुंडलिंकराव वाघरे, चंद्रपूर शहर राहूल गंगाधर पावडे, चंद्रपूर ग्रामीण हरीश शर्मा, बुलढाणा गणेश मांटे, खामगांव सचिन देशमुख, अकोला शहर जयंत मसने, अकोला ग्रामीण किशोर मांगटे, वाशिम शाम बढे, अमरावती शहर प्रविण पोटे, अमारवती ग्रामीण डाॅ. अनिल बोंडे, यवतमाळ तारेंद्र बोर्डे आणि पुसद जिल्हाध्यक्ष म्हणून महादेव सुपारे यांची नियुक्ती करण्यात आले.

 

 

मराठवाडा विभाग

नांदेड शहर दिलीप कंदकुर्ते, नांदेड उत्तर (जिल्हा) सुधाकर भोयर, नांदेड दक्षिण संतुकराव हंबर्डे, परभणी शहर राजेश देशमुख आणि परभणी ग्रामीण संतोष मुरकुटे, हिंगोली फुला शिंदे, जालना ग्रामीण बद्री पठारे, संभाजीनगर शिरीष बोराळकर, संभाजीनगर उत्तर सुहास सिरसाट, संभाजीनगर दक्षिण संजय खांबायते, लातुर शहर देविदास काळे, लातुर ग्रामीण दिलीपराव देशमुख आणि धाराशिव जिल्हा अध्यक्ष म्हणून संताजीराव चालूक्य यांची नियुक्ती बावनकुळे यांची केली.

ठाणे -कोकण विभाग

भिवंडी अॅड. हर्षल पाटील, निरा भाईंदर किशोर शर्मा, नवी मुंबई संदीप नाईक, कल्याण नरेंद्र सुर्यवंशी, उल्हासनगर प्रदिप रामचंदानी, वसई-विरार महेंद्र पाटील, पालघर भरत राजपूत, सिंधुदूर्ग प्रभाकर सावंत, रत्नागीरी उत्तर केदार साठे, रत्नागीरी दक्षिण राजेश सावंत आणि रायगड उत्तर अविनाश कोळी, रायगड दक्षिण धैर्यशिल पाटील, ठाणे शहर संजय वाघुले आणि मधुकर मोहपे यांची नियुक्ती करण्यात आली.

 

पश्चिम महाराष्ट्र विभागा

पुणे शहर धिरज घाटे, पुणे ग्रामीण बारातमी वासुदेव काळे, पुणे मावळ शरद बुट्टे पाटील, पिंपरी-चिंचवड शंकर जगताप, सांगली शहर प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण निशिकांत भोसले पाटील,सोलापूर ग्रामीण सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर नरेंद्र कोळी, सोलापूर म्हाडा चेतन केदार -सावंत. कोल्हापूर शहर विजय जाधव, कोल्हापूर ग्रामीण पश्चिम राहूल देसाई, कोल्हापूर – हातकणंगले (पूर्व) राजवर्धन निंबाळकर आणि सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून धैर्यशिल कदम यांची नियुक्ती करण्यात आली.

 

उत्तर महाराष्ट्र विभाग

नाशिक शहर प्रशांत जाधव, नाशिक ग्रामीण-दक्षिण सुनिल बच्छाव, नाशिक दिंडोरी (उत्तर) शंकर वाघ, मालेगांव निलेश कचवे, जळगांव शहर उज्वला बेंडाळे, जळगांव ग्रामीण ज्ञानेश्वर महाराज जवळेकर, जळगाव रावेर अमोल जावळे, अहमदनगर शहर अभय आगरकर, अहमदनगर उत्तर विठ्ठलरावर लंघे, अहमदनगर दक्षिण दिलीप भालसिंग, नंदुरबार निलेश माळी, धुळे शहर गजेंद्र अंपाळकर आणि धुळे ग्रामीणच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी बबनराव चौधरी यांच्याकडे सोबविण्यात आली आहे.

Local ad 1